सोलापूर – दिनांक 04 डिसेंबर 2025 रोजी व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नर्सरी ते इ 10 पर्यंतच्या एकूण 1500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे सुरुवात प्रमुख पाहुणे अस्थिरोग तज्ञ डॉ अभिजीत वाघचवरे व त्वचारोग तज्ञ डॉ राजश्री वाघचवरे,आयूर्वेदिक डॉ नविन संतोष गड्डम यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी देवतेच्या पूजनाने करण्यात आले.
या एक दिवशीय शिबिराचे संपूर्ण संयोजन आयुर्वेदिक डॉ नविन संतोष गड्डम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शिबीरात उपस्थित डॉ अमर बंडी, डॉ हेमाक्षी बंडी, डॉ ज्योती गायकवाड, डॉ संजना नामा, डॉ सायली भांगे, डॉ स्वप्निल सामील, डॉ ऐश्वर्या वर्णेकर, डॉ विशाल भोसले, डॉ कोमल मानकर, डॉ विशाल अंधलकर, डॉ वेदिका पगडीमल, डॉ अनंत म्हेत्रे, डॉ दिनेश पगडीमल, डॉ अमित विटकरी, डॉ परमेश्वर निकम, डॉ प्रकाश तोलानी या सर्व तज्ञ डॉक्टरांच्या प्रशालेच्या वतिने सत्कार करण्यात आला.
या डॉक्टरांमध्ये बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, दंतरोग तज्ञ,जनरल फिजिसियन, आयुर्वेदिक डॉ,इ चां समावेश होता. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापूरे उपाध्यक्ष सौ यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम व सहसचिव नागेश शेंडगे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कल्याणी जी एच उपमुख्याध्यापिका मिना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनिता मंद्रुपकर व नागमणी पेगडा व सुप्रिया बोम्मा क्रीडा विभाग प्रमुख श्री संतोष पाटील आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमधील आजाराची आरंभिक लक्षणे ओळखून त्यांची तपासणी करणे व विद्यार्थ्यांचा दुर्लक्षित राहणाऱ्या आरोग्य समस्यांचा शोध घेऊन तज्ञ डॉक्टरांच्या अनुभावाचा व चिकित्सक मार्गदर्शनाचा लाभ करून देणे,पालक व विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य विषयाक जागरुकता निर्माण करणे. या शिबिराचे प्रमुख पाहुणे डॉ अभिजीत वाघचवरे आपल्या मनोगतातून म्हणले की विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आरोग्यालाही महत्त्व दिली पाहिजे.
आपल्या शारिरीक तंदुरुस्ती बरोबर मानसिक व भावनिक आरोग्यता आध्यात्मिक तेची जोड द्यावी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ तेजश्री पगडीमल व आभारप्रदर्शन सौ स्वेता येमेकर यांनी केले

















