लोहा / प्रतिनिधी
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा महायुतीने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल भाजपाचे पंचायतराज ग्राम विकास विभागाचे प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांनी भाजपाचे पंचायतराज ग्राम विकास विभागाचे दक्षिण मराठवाडा सहसंयोजक माधव पांचाळ यांचे अभिनंदन केले.
गणेश काका जगताप यांनी पुढे अभिनंदन पत्रकात असे नमूद केले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत भरभरून यश तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ आहे . आपण घेतलेल्या मेहनतीमुळे भाजपाचे १३२ व मित्र पक्षाचे १०२ आमदार निवडून आलेत यात आपल्या पंचायतराज व ग्राम पंचायत विभागाचा सिंहाचा वाटा आहे . हे फक्त तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे शक्य झाले आहे . आपल्या पक्षाला व मला कायम अशीच साथ मिळो हीच अपेक्षा व पुन्हा अभिनंदन असे नमूद केले.