मुखेड / नांदेड – मुखेड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने दि.९ नोव्हेंबर रोजी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या असुन नगराध्यक्ष पदासाठी ०१ अर्ज तर नगरसेवक पदासाठी ५६ अर्ज आल्याची माहिती काँग्रेसने पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजल्यानंतर राजकीय पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या असून रविवार दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी येथील काँग्रेस भवनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रदेश महासचिव डॉ.श्रावण रॅपनवाड,तालुकाध्यक्ष राजू पाटील रावणगावकर,जिल्हा उपाध्यक्ष राजन देशपांडे,शौकत पठाण,शहराध्यक्ष हनमंत नारनाळीकर आदींनी नगराध्यक्षपदासह इच्छुक नगरसेवक पदाच्या उमेदवारांची मुलाखत घेतल्या आहेत.नगराध्यक्ष पदासाठी डॉ. दिपाली श्रावण रॅपणवाड यांनी तर नगरसेवक पदासाठी २० जागेसाठी ५३ जणांनी मुलाखती दिल्या असुन ५६ जणांनी उमेदवारी अर्जाच्या माध्यमातून उमेदवारी ची मागणी केली आहे.
यावेळी मुखेड नगरपालिका निवडणुकीसाठी डॉ.श्रावण रॅपणवाड यांच्या अध्यक्षतेत कोर कमिटीची स्थापना करण्यात आली आहे.या कमिटीत सदस्य म्हणून शहराध्यक्ष हनमंतराव नारनाळीकर,युवकचे अध्यक्ष जयप्रकाश कानगुले,रामेश्वर पाटील इंगोले,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष इम्रान पठाण, शिवाजी गायकवाड,इरफान मोमीन यांची निवड करण्यात आली आहे.पत्रकार परिषदेस तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीत सक्षम पर्याय देवू-रॅपनवाड…
नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी सक्षम पर्याय देवून मतदारांच्या आशिर्वादाने चमत्कारीक निकाल देवु असे मत प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डाॅ.श्रावण रॅपनवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.


























