मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव व राज या ठाकरे बंधूची युती निश्चित झाल्याने त्यांच्यापासून विभक्त होण्याचा सुर आवळलेल्या मुंबई काँग्रेसने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी आघाडी करण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव घेऊन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खा. वर्षां गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नेत्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी सिल्वर ओक येथे पवार व खा. सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आघाडीचा प्रस्ताव दिला. मात्र पवार यांनी त्याबाबत तात्काळ भूमिका स्पष्ट न करता स्वतंत्रपणे बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले
काँग्रेसच्या शिष्टमंडळात , माजी मंत्री आ. अस्लम शेख, आ. अमीन पटेल, आ. ज्योती गायकवाड, जिल्हाध्यक्ष रवि बावकर आदीचा समावेश होता.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खा. गायकवाड म्हणाल्या की, बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली असून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी व्हावी अशी आमची अपेक्षा आहे, त्यांच्या पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव व इतर नेत्यांशी चर्चा झालेली आहे. लवकरच दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक घेऊन त्यानंतर आघाडीसंदर्भातील निर्णय होईल.,
मुंबई महानगरपालिका निवडणूक ही लोकशाही व संविधान माननाऱ्या पक्षांशी आघाडी करुन लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नैसर्गिक आघाडी असून दोन्ही पक्ष लोकशाही व संविधानवादी आहेत. असे सांगून
आघाडीत मनसेच्या सहभागासंदर्भात त्या म्हणाल्या की, खा. संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वीच निवडणुकीत स्वबळावर जाऊ अशी भूमिका मांडली होती. ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचे स्वागतच आहे पण त्याबाबत काँग्रेसशी काहीही चर्चा झालेली नाही. काँग्रेसने जेव्हा कोणत्या पक्षाशी आघाडी केली तेव्हा किमान समान कार्यक्रमाच्या आधारे केलेली आहे. बीएमसी निवडणूक समविचारी पक्षांना बरोबर घेऊन लढली पाहिजे असा आमचा विचार आहे. मुंबईत देशाच्या सर्व भागातील लोक राहतात, मुंबईच्या विकासात सर्वांचे योगदान आहे. कायदा हातात घेणारे, दडपशाही करणाऱ्यांबरोबर काँग्रेस पक्ष जाऊ शकत नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकाना जोडण्याचे, प्रेम देण्याचे काम केले आहे
महानगरपालिकेची निवडणूक ही मुंबईच्या प्रश्नावर झाली पाहिजे. जात, प्रांत, भाषा आणि धर्म यावर न होता मुंबईकरांचे प्रश्न महत्वाचे आहेत. मुंबईत प्रदुषणाची मोठी समस्या आहे, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण बीएमसी मधील भ्रष्टाचार हे मुद्दे आहेत त्यावर आवाज उठवला जाईल, असेही त्यांनी सांगितले.




















