सोयगाव / संभाजीनगर – येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिरीष पवार तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.रावसाहेब बारोटे,पदव्युत्तर समन्वयक डॉ.शत्रुघ्न भोरे तर प्रमुख वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.लेखाचंद मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये संविधान दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी प्रमुख वक्ते डॉ.लेखाचं मेश्राम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,विद्यार्थी,शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांना संविधान दिनाचा पूर्ण इतिहास सांगून सखोल मार्गदर्शन केले.त्यानंतर संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कनिष्ठ विभाग प्रमुख डॉ.उल्हास पाटील,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.पंकज गावीत,डॉ.सुनील चौधरे महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.निलेश गावडे यांनी केले तर डॉ. सुनील चौधरे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक,कार्यक्रमाधिकारी डॉ.निलेश गावडे,डॉ.पंकज गावित,डॉ.सुनील चौधरे,डॉ.श्रीकृष्ण परिहार व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
सोबत फोटो –
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















