आचेगांव – आचेगांव ता. दक्षिण सोलापूर येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आले.
ग्रामपंचायत कार्यलय येथे संविधान दिनानिमित्त संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भाजप अनु जाती जिल्हासरचिटणीस बलवान गोतसुर्वे यांच्या हस्ते तर तथागत बुद्धविहार येथील पूजन ग्रामपंचायत अधिकारी सौ.रुक्मिणी कांबळे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आले.
प्रारंभी श्री शावरसिद्ध हायस्कूल च्या वतीने संविधान रॅली काढण्यात आले. तसेच संविधान प्रस्ताविक प्रतिज्ञा घेण्यात आले. या प्रसंगी सरपंच विश्रांती पाटील, उपसरपंच रफिक मुल्ला, मुख्याध्यापक इब्राहिम बिराजदार, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती मंगल ताई गोतसुर्वे, ग्रामपंचायत सदस्य नागप्पा कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष पंडित गोतसुर्वे, प्रदीप पाटील, जयंती उत्सव अध्यक्ष राम गोतसुर्वे, विकास सुर्वे,भगवान गोतसुर्वे,काशिनाथ क्षीरसागर,जालिंदर गोतसुर्वे, बलराम सुर्वे,भारत गोतसुर्वे, मनोज गोतसुर्वे,इरफान पटेल, रवि विधाते, उत्तरेश्वर सुर्वे, शावरसिद्ध माळी, खाजेंद्र भणजे, तसेच श्री शावरसिद्ध प्रशालेचे मुख्याध्यापक इब्राहिम बिराजदार सर, सर्व शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थीनी गावकरी मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.



















