सोलापूर – श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय,हत्तुरे नगर,सोलापूर येथे संविधान दिन साजरा झाला. मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे,प्रभारी मुख्याध्यापक रमेश दिंडोरे,अनिलकुमार गावडे,जिल्हा कौशल्य विकास रोजगारचे जिल्हा समन्वयक सिद्धप्पा बनसोडे व लिपिक वर्ग तृष्णा गायकवाड,रेश्मा विद्याधर, रोहिदास डोईफोडे यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले.यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सुनीता गंगोंडा यांनी संविधानातील हक्क,कर्तव्य,मूल्ये यांचे महत्त्व सांगत संविधानाविषयी माहिती सांगितली.
या संविधान दिनानिमित्त निबंध, चित्रकला,रांगोळी,प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या व प्रशालेतील विद्यार्थ्यांनी नगरातून संविधान जागृतीविषयी घरोघरी संविधान,हर घर संविधान अशा घोषणा देत रॅली काढली.
या कार्यक्रमास प्रशालेतील शिक्षक आनंद काकडे,दत्तात्रय आगरखेड,सुकेशनी गंगोडा,अमरनाथ कदारे,गणेश कोरे,संतोष स्वामी व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश आगवणे यांनी केले,तर आभार प्रतीक्षा बिडवे यांनी मानले.
















