वेळापूर – लोकविकास इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान चे पूजन लोकविकास ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक अमोल पांढरे तसेच लोकविकास इंग्लिश मीडियम चे मुख्याध्यापक अश्विनी शिंदे अजित बनकर विजया चापले यांनी केले.
संविधानाचे वाचन साठे यांनी केले व संविधान दिनानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच संविधानाविषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा ,संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा मानवी साखळी ,सेल्फी पॉईंट संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच संविधान दिनानिमित्त इयत्ता सहावी मधील अनुष्का पांढरे व शिवम वावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच सहशिक्षिका प्रियंका अनंत कवळस यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक वैभव जगताप व आभार प्रदर्शन कोमल चव्हाण यांनी केले या कार्यक्रमासाठी उषा राऊत ,वैशाली आदलिंगे,ज्योती गाडेकर ,पूजा कुदळे आदी शिक्षक उपस्थित होते.



















