हिंगोली – औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे आज दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय शिरड शहापूर येथे संविधान दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमांमध्ये शिरड शहापूर चे सरपंच यशवंत जी रावले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान उद्देश पत्रिकेच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच बार्टी हिंगोली जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे साहेब व सायक आयुक्त कार्यालय, हिंगोली यांच्या आदेशान्वये समतादूत- सुकेश कांबळे, कार्यक्षेत्र औंढा नागनाथ. यांनी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन केले. तसेच संविधाना चे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले.
सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक गजानन अंतेवार यांनी केले. सदरील कार्यक्रमास ग्रामपंचायत चे सदस्य जयराम सूर्यतळ, शरद बीचेवार, बबन ढेंबरे, राजकुमार जैन, विश्वनाथ गायकवाड अनेक ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.




















