पुणे, 14 नोव्हेंबर (हिं.स.)।पिंपरी (अ.जा.) विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, त्याअनुषंगाने पिंपरी विधानसभा मतदार संघ कार्यालयाकडुन मतदानकेंद्र निहाय मतदान यंत्रे (EVM व VVPAT) मतदानासाठी तयार करणेचे कामकाज आज दि. १३/११/२०२४ सुरूवात करणेत आले आहे. पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी ४७७ बॅलेट युनिट, ४७७ कंट्रोल युनिट आणि ५१७ व्हीव्हीपॅट मशीन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध झाले आहेत. पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण ३९८ मतदान केंद्रे आहेत. या मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूकीसाठी रिंगणात असून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ३९८ मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी १ बॅलेट युनिट, १ कंट्रोल युनिट व १ व्हीव्हीपॅट यंत्रे वाटप करण्यात आली असून ७९ बॅलेट युनिट, ७९ कंट्रोल युनिट आणि ११९ व्हीव्हीपॅट यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहेत.
त्याअनुषंगाने पिंपरी विधानसभा मतदार संघ कार्यालयाकडुन मतदानकेंद्र निहाय मतदान यंत्रे (EVM व VVPAT) मतदानासाठी तयार करणेची प्रक्रिया दि. १३/११/२०२४ ते १४/११/२०२४ या कालावधीत करणेत येत आहे. मतदान यंत्रे तयार करणे व इतर अनुषंगीक कामे करणेसाठी सेक्टर ऑफीसर, मास्टर ट्रेनर,एक शिपाई अशा एकुण ४५ टेबल करिता १३५ अधिकारी/कर्मचारी यांची नेमणुक करणेत आली आहे. EVM व VVPAT मशीन्स केंद्रनिहाय सिलिंग करणेकरिता देणे व तयार झालेल्या मशीन्स केंद्रनिहाय लावून घेणे, खराब झालेली मतदान यंत्रांची नोंद घेणे व ती बदलुन देणे, EMS वरील Data entry पूर्ण करणे तसेच EVM संबधीत सर्व रिपोर्टींग तयार करणेसाठी १० अधिकारी व ४५ कर्मचारी यांचे पथक नेमणेत आले आहे.
मतदानास EVM व VVPAT मशीन तयार करणेकरीता सिलिंग साहित्याचे टेबलनिहाय ट्रे बनविणे साहित्यांची नोंद विहित नमुन्यात घेणेसाठी भांडारपाल यांच्यासह १० अधिकारी कर्मचारी यांची नेमणुक करणेत आलेली आहे. मतदान यंत्र तयार करणेबाबत सर्व उमेदवार व राजकीय पक्षांना कळविण्यात आले असल्याचे पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे. तसेच जयराज देशमुख यांची समन्वय अधिकारी, प्रशांत शिंपी नोडल अधिकारी, अभिजीत केंद्रेकर सहा. समन्वय अधिकारी, विजय भोजने माध्यम समन्वयक, ५%EVM मशिन्स मॉकपोल व श्रेडींग करण्यासाठी नागू वाकसे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, राजेंद्र जावळे कार्यकारी अभियंता यांची पथक प्रमुख, तुषार पडवळ भांडारविभाग समन्वयक, म्हणुन नेमणुका करणेत आलेल्या आहेत.