कुर्डूवाडी – नगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर शहरातील राष्टृवादी काँग्रेसचे नवनिर्वाचीत नगरसेवक तातडीने आरोग्यविषयक स्वच्छतेच्या कामाला लागले असून मागील पंधरा वर्षापासुन बहुचर्चीत पण दुर्लक्षीत अशी गाळाने तूडुंब भरून बंद स्वरूपात असलेली पोष्ट रोड जवळील मुख्य गटार अखेर नूतन नगरसेविका वृशाली महेश गांधी यांच्या प्रयत्नातून प्रवाहीत झाल्याने निवडणूक प्रचारादरम्यान मतदारांना दीलेला शब्द व स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आ.संजयमामा शिंदे यांनी दाखवलेला विस्वास सार्थ ठरवत शब्द पुर्ण केले असल्याचे समाधान यावेळी नागरीकांनी व्यक्त केले .
शहरातील राष्टृवादी काँग्रेसचे नूतन नगरसेवक शहर स्वच्छतेच्या कामाला जोमाने लागले असल्याचे चित्र सध्या सर्वत्र शहरात पहावयास मीळत आहे.शिवसेनेच्या नगराध्यक्षा जयश्री भिसे स्व:ता रोज सकाळी पहाटेपासुनच सर्वत्र फेरफटका मारून स्वच्छतेच्या कामाची पाहणी कताना दीसुन येत आहेत.मागील पंधरा वर्षापासुन तरटे फोटो स्टुडीओ समोरील पोष्यरोड लगतची जुनी सार्वजनिक गटार गाळाने तुडुंब भरल्याने नादुरूस्त असून तुंबलेली होती त्यामुळे या परिसरात दुर्गंधीसह डासांचे प्रमाणही वाढले होते.याबाबत पंधरा वर्षात नगरपालिका कर्मचारी तसेच पदाधिकारी यांनी साफ दुर्लक्ष केले असल्याचे नागरीक सांगतात.
येथील प्रभागातील नगरसेविका वृशाली गांधी यांनी निकालानंतर तातडीने येथील काम हाती घेतले व जे.सी.पी.च्या सहाय्याने स्वता उभे राहुन गटार फोडून काडली परंतू गटारी तरीही प्रवाहीत होत नव्हती.याच गटारीवर लगतच न.पा.ची सार्वजनिक मुतारीही असल्याने त्याखालीच मोठ्याले दगडी चिरा असल्याने प्रवाहीत होत नसल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर वृशाली गांधी यांंचे पती महेश गांधी यांनी निवृत्त स्वच्छता कर्मचारी बापू खिलारे यांची मदत घेतली.त्यांनी मुतारीखालील गटारीमध्ये शिरून अथक प्रयत्नातून दगड व गाळ बाहेर काडले अन संपुर्ण गटार प्रवाहीत केली.
यावेळी खिलारे यांच्या कामाचे कौतुक सर्वांनी केले.सर्वत्र चर्चा होताच नगराध्यक्षा जयश्री भिसे यांनीही कामाची पाहणी केली.न.पा.अभियंता अक्षय खटके यांनी पाहणी केली असता तातडीने याठीकाणी चेंबर बांधून देण्याचे आश्वासन दीले मात्र आठवडा उलटला तरी निधीअभावी चेंबर बांधण्यास सुरवात झालेली नसल्याचे समजले.शेवटी आरोग्य व स्वच्छता कमिटीचे सभापती मोहसिन मकणू यांनी लवकरात लवकर तोडगा काडण्यासाठी कामाची पाहणी केली.
याठीकाणची गटार जर आठवड्यात प्रवाहीत नाही झाली तर राष्टृवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे शहराध्यक्ष दत्ता गवळी हे येथील गटारीची विधीवत पुजा करून येथील पाण्याचे हांडे भरून नगरपालिकेसमोर वाजतगाजत घेवून जाणार होतो असे सांगीतले होते मात्र ते कष्ट घेण्याची वेळच वृशाली गांधी यांनी येवू दीली नाही. या कामाबरोबरच पंढरपूर रोड लगतचा कचरा व गाळ काडून स्वताच्या टीपरने भरून तेथेही स्वच्छ परिसर त्यांनी केला आहे. यावेळी आर्शद मुलाणी यांचेही सहकार्य लाभले
पोष्ट रोडलगतची गटार पंधरावर्षापासुन गाळाने बंद पडली होती.येथे पाणी साचलेले असायचे. या गटारीवर मुतारी असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी वाढली असल्याने डासाचेही प्रमाण जास्त होते.प्रचारादरम्यान येथील सर्व व्यापारी वर्गाने या गटारीचे काम करण्याचे वृशाली गांधी यांच्याकडून आश्वासन घेतले होते.त्याची आज पुर्तता झाल्याचे सर्वांना समाधान आहे.
समिर तरटे, नागरीक कुर्डूवाडी.
……..
पोष्ट रो़डची गटार बगुचर्चीत होती.दुर्गंधी व डासाने येथील व्यापारी व नागरीक हैराण होते.आम्ही येथील नागरीकांना निवडणूकीत हे काम करण्याचे धाडसी आश्वासन दीले होते.तसेही असे कठीण काम पुर्णत्वास नेहून माजी आ.संजयमामा शिंदे यांनी जो विस्वास दाखवला होता याबरोबरच स्व.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची कन्या असा उल्लेख केेेला होता तो विस्वास सार्थ ठरवायचा होता आणी तो सार्थ ठरवल्याचे मोठे समाधान वाटते.
वृशाली महेश गांधी, नगरसेविका.






















