तभा फ्लॅश न्यूज/ वाशी : यवतमाळ मधून शेकडो किलोमीटरचा प्रवास करून धाराशिव जिल्ह्यात आलेला वाघ आणि काही तालुक्यात बिबट्यांनी केलेली दहशत यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होतं. काही ठिकाणी जनावरांचा फडशा पाडला होता तर काही ठिकाणी हल्ल्यात जनावरे गंभीर जखमी झाली होती. नेमका वाघ की बिबट्या हा प्रश्न होता? त्यानंतर सर्वत्र गोंधळ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानं वनविभागाने रामलिंग अभयारण्यात ट्रॅप कॅमेरे लावले होते.
वाघाचं छायाचित्र कैद झालं आणि मग काय शेतकरी व नागरिकांमध्ये जास्तच भीतीचं वातावरण पसरलं अनु पुढे वनविभागाकडून सुरू झाली ती वाघाची शोध मोहीम. वाघ पुढेपुढे वनविभागाचे अधिकारी मागे-मागे असे करत वाघाने सोलापूर जिल्ह्यात दमदार इन्ट्री केली आणि धाराशिव जिल्ह्यातील वाघाची दहशत व चर्चा मध्यंतरी थोडीफार कमी होत हे सूत्र थांबलं.
मात्र आता वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी शिवारामध्ये रात्री तीन जनावरांचा फडशा पडला असल्यानं बिबट्या की वाघानं हा हल्ला केला आहे? हे आता वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा शोधण्याचा भाग आहे. कडकनाथवाडी येथील शेतकरी श्रीराम शिंदे रोजच्याप्रमाणे आपली जनावर शेतात बांधून घरी आले होते. सकाळी दूध काढण्यासाठी शेतात गेल्यानंतर जनावरांच्या बाबतीत त्यांना समोर भयान चित्र दिसले. शिंदे यांनी यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना बोलावून परिस्थिती दावली. त्यानंतर परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं असून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला बिबट्या किंवा वाघाने केला याची चर्चा शेतकरी नागरिकांमध्ये सुरू आहे. झालेल्या या घटनेनं परिसरातील गावामध्ये भीतीचं वातावरण आहे.
“जिल्ह्यात पवनचक्कीची अनु वाशी तालुक्यात बिबट्या की वाघाची दहशत?
मागील काही दिवसापासून वाशी तालुक्यात पवनचक्की कंपनीने शेतकरी वर्गात दहशत माजवली असताना आता वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी शिवारात तीन जनावरांचा फडशा पाडल्याने बिबट्या की वाघ? याची दहशत नागरिक व शेतकरी वर्गामध्ये आहे. बिबट्या की वाघ हा वन विभागाचा शोधण्याचा भाग आहे तर दुसरीकडे पवनचक्की प्रकरणात प्रशासनाचा”