सोलापूर : सीसीएच ॲपद्वारे मागील वर्षभरात सोलापूरकरांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा क्रिप्टो करन्सी द्वारे कोट्यावधीची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे याप्रकरणी सोलापूरच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसात आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीमध्ये सोनीटिक्स कंपनीचे नाव समोर येत आहे.
शंभर दिवसात डबल पैसे देण्याचे गुंतवणूकदारांना आमिष दाखवून सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
फसवणूक झालेल्या नागरिकांनी काही सामाजिक संघटनांची संपर्क साधून माध्यमांसमोर आपले म्हणणे मांडले आहे.
सोनीटिक्स कंपनीचे संचालक, पार्टनर आणि एजंट यांचे गुंतवणूकदारांना प्रलोभन दाखवून शिववर्स क्रिप्टो कॉइनची निर्मिती करून अनेकांना भावनिक करून फसवणूक केल्याचा आरोप यावेळी माध्यमांशी बोलताना करण्यात आला.