मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार आठवड्यात भारताच्या गंगाजळीत विदेशी संपत्ती 16.54 अब्ज डॉलर्स म्हणजेच 1.37 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. भारताच्या परकीय चलनाचा साठा चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय संपत्तीचा साठा 600 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. शुक्रवारी आलेल्या आकडेवारीत 2.82 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. परदेशातील संपत्ती सध्या किती वाढली आहे. परकीय चलन राखीव किती आहे? यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहुयात.
राखीव परकीय चलन किती ?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) दिलेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 2.816 अब्ज डॉलरने वाढून 606.859 अब्ज डॉलर झाला आहे. मागील अहवालात आठवडाभरात एकूण साठा 6.107 अब्ज डॉलरने वाढून 604.042 अब्ज पर्यंत गेला होता. विशेष बाब म्हणजे ऑक्टोबर 2021 मध्ये, म्हणजे सुमारे दोन वर्षांपूर्वी, देशाचा परकीय चलन साठा 645 अब्ज यूएस डॉलरच्या उच्चांकावर होता. याचा अर्थ सध्या देशाचा परकीय चलन राखीव उच्चांकापेक्षा 38 अब्ज डॉलर्स मागे आहे. गेल्या वर्षीपासून, सेंट्रल बँकेने रुपया उचलण्यासाठी परकीय चलन साठा खर्च केला होता. त्यामुळे साठ्यात घट दिसून आली.
सलग चार आठवड्यांपासून वाढ
10 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा केवळ 590.32 अब्ज डॉलर होता. त्यानंतर त्यात सातत्याने वाढ होत आहे. 17 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 595.40 अब्ज डॉलर झाला आहे. 24 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, त्यात आणखी वाढ झाली होती. ती 597.94 अब्ज डॉलर झाली होती. 1 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, देशाच्या परकीय चलन गंगाजळीने 600 अब्ज डॉलरची पातळी ओलांडली आहे. 604.04 अब्ज डॉलर झाली आहे. सलग चौथ्या आठवड्यात वाढ होत आहे. 8 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात त्यात आणखी वाढ झाली आहे. देशाचा परकीय चलन साठा आता 606.859 डॉलरवर आहे.
देशाच्या परकीय चलन साठ्याला FOREX किंवा Foreign Reserve Exchange असंही म्हटलं जातंय. हा साठा परकीय चलनाच्या रुपात साठवला जातोय जेणेकरुन ही रक्कम आवश्यक त्यावेळी वापरता येईल. सध्या भारताचा परकीय चलन साठा हा डॉलरच्या स्वरुपात साठवला ठेवला जातोय कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर हे सर्वाधिक वापरलं जाणारं आणि विश्वासू चलन आहे.