तामसा – तामसा येथील राम मंदिरात अयोध्येतील राम मंदिरावर ध्वजारोहणाच्या औचित्याने घेण्यात आलेल्या महाआरतीला प्रतिसाद मिळाला असून रामभक्तांनी आरती व दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.
यानिमित्त सुमनबाई निलावार यांच्या हस्ते मंदिर परिसरातील नव्या भरवण्यात आलेल्या ध्वजाचे पूजन करून अनावरण झाले. मंदिरातील श्रीराम सीता लक्ष्मण यांच्या मूर्तीची सामूहिक आरती झाली. मंदिर परिसर जयश्रीरामच्या घोषणांनी दणाणून गेला होता. यावेळी बालाजी मंदिराचे विश्वस्त स्वप्निल बंडेवार यांनी अयोध्येतील मंदिरावरील ध्वजाची माहिती सांगितली.
यावेळी मंदिराचे पुजारी अमोल तामसेकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर ज्येष्ठ व्यापारी दीपक बंडेवार,शशिकांत बंडावार, सचिन तांदळे,बाजार समितीचे माजी उपसभापती विशाल परभणकर,भाजप शहराध्यक्ष शिवराज वारकड, दीपक देशमुख, भाजप पदवीधर प्रकोष्ठ महेश मठपती,अर्जुन जोशी, गजानन लाभसेटवार, डॉ. दीपक नाईक,गणेश शिंदे, किरण वारकड,अमोल वाळकीकर,आशिष बीजमवार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



















