माळशिरस : तालुक्यातील इस्लामपूर येथे महाशिवरात्र यात्रे निमित्त संभाजी बाबा मंदिरामध्ये सकाळ पासून भाविक भक्ताने दर्शनासाठी गर्दी केली होती .इस्लामपूर येथे श्री संत संभाजी बाबाचे पाच शिखर असलेले एकमेव प्राचीन मंदिर आहे .परिसरातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे .हिंदू धर्मात महाशिवरात्रीला मोठं महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त देशभर शिव मंदिरात जाऊन भाविक शिवलिंगावर अभिषेक करतात. महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी इस्लामपुरातील संभाजी बाबा मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती . सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. पहाटे शिवलिंगाची महापूजा आणि अभिषेक करण्यात आला.याठिकाणी श्री.संत गोंदावले महाराज यांच्या आई वडिलांनी वा-या केल्याचे जुने जाणकार सांगतात या यात्रेनिमित्त संभाजी बाबा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले होते तसेच यात्रेनिमित्त विविध खेळणी खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली होती देवस्थान व अनेक भाविक भक्तांच्या वतीने भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले
माळशिरस येथील पुरातन मंदिरात भाविकांची गर्दी
माळशिरस शहरातही नगरपंचायत चौकात पुरातन चालुक्यकालीन महादेव मंदिर आहे या मंदिरातही सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती
या मंदिरात पुरातन वराहाची मूर्ती असून या मंदिराच्या सभामंडपाचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आला आहे तसेच शहरातील महाबळेश्वर येथील महादेव मंदिरात व पोरे वस्तीवरील महादेव मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली





















