नरखेड – मोहोळ तालुक्यातील नरखेड सह परिसरातील देगाव( वा ),डिकसळ, मसले चौधरी, हिंगणी, भोयरे, एकुरके ,मलिकवाडी, येलमवाडी, खुनेश्वर, भांबेवाडी शिरापूर आदी गावांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेव मंदिरात शिवभक्ताने शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करून महाशिवरात्र धार्मिक कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.
नरखेड ता मोहोळ येथील महादेव माळ येथील महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांनी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी रविवारी हजारो भाविक भक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याने सर्वत्र शिव-पार्वती हर हर महादेव, चा गजर करण्यात आला. महादेव मंदिरामध्ये पहाटे पाच वाजता महा अभिषेक रुद्राभिषेकानंतर, विधिवत पूजेनंतर नरखेड सह एकुरके, बोपले,येलमवाडी, देगाव, डिकसळ,मलिकपेठ,भोयरे, आदी गावच्या भक्ताने दिवसभर शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्यामुळे मंदिरात हर हर महादेव, चा गजर सुरू होता.
नरखेड येथील महादेव मंदिरामध्ये अखंड शिवनाम व हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर परिसरात मेवा मिठाई, खेळणी, पाळणे, रस पानगृह, आधी दुकानाने उत्साही वातावरण पसरले होते.
शिव मंदिरात येणाऱ्या भाविकांना सकाळ- संध्याकाळ ८ दिवस चहापाणी,भोजन तर महाशिवरात्री दिवशी खिचडी, शाबू चिवडा, भगर, शेंगदाण्याचे लाडू खजूर,दूध,केळी, राजगिऱ्याचे लाडू,फळे,द्राक्ष आधी आधी फराळाचे वाटप दिवसभर चालू होते.
तर सोमवारी सकाळी फुगडी, दिंडीसह काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने महाशिवरात्रिच्या सप्ताहाची सांगता केल्याचे हभप रामचंद्र कुदळे, रामचंद्र मोटे, महादेव तागडे, सुनील झुंजार, तुकाराम तागडे, मारुती कुदळे, नामदेव झाडे, नानासाहेब ढवण , सुधाकर पाटील आदींनी सांगितले .























