लातूर / उदगीर – माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याशी उदगीरच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत तीन विषयांवर सकारात्मक चर्चा झाली उदगीर शासकीय दूध डेअरी, उदगीर शहर पोलीस स्टेशन हद्दवाढ, आणि उदगीर नगर परिषद हद्दवाढ.
15 एप्रिल 2025 रोजी राणे यांनी मुख्यमंत्री यांना विनंती पत्र दिले होते. त्यानुसार सचिवांना तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले. दूध विकास मंत्री अतुल सावे यांनी प्रस्ताव मंजूर केला असून सध्या तो मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर अंतिम मंजुरीसाठी पेंडिंग आहे. तो लवकरात लवकर पारित करावा, अशी विनंती बैठकीत करण्यात आली.

राणे यांनी मुख्यमंत्री यांना सांगितले की, नागपूरला विदर्भासाठी जशी डेअरी उभी केली जात आहे, तशीच मराठवाड्यासाठी उदगीरला डेअरी उभी करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुसरा आर्थिक आधार मिळेल. 6 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील . नितीन गडकरी याच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीतील माहितीही मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.
या बैठकीस शासकीय दूध योजना पुनर्जीवन समितीचे सदस्य अॅड. नरेश सोनावणे व एस. एस. पाटील उपस्थित होते.




















