निवघा / नांदेड – दि 29, 30 ऑक्टोंबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व मुसळधार पाऊसामुळे शिवारातील शेतकर्याच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले असून, या मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतात लावलेल्या सौर उर्जा पॅनललाही मोठा तडाखा बसला आहे.
हदगांव तालुक्यात सायंकाळी अचानक आलेला वादळी वारा आणि मुसळधार पाऊसामुळे निवघा बा ता. हदगाव येथील शेतकरी कोडबाराव देवराव शेळके गट क्रमांक 66/7 या शेतात लावलेल्या सौर उर्जा पॅनलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर जवळच असलेल्या गोठ्यावरची पत्रे उडून गेले.
सुदेवाने यात कुठलीही जीवित हानी आली नाही पिडीत शेतकरी या वर्षी आपल्या शेतात जे के. कंपनीचा सौर सौलर पॅनल बसविले होते. मात्र, मारा मुसळधार पावसामुळे या मोठ्या प्रमाणात प्रमाणात सौर पॅनलचे सौर पॅनलचे नुकसान झाले असून, हैं पॅनल वादळी वाऱ्याच्या तडाख्यात सापडले असून ठिकठिकाणी फुटले आहे. आलेल्या अस्मानी संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

























