कोळा – सांगोला तालुक्यातील राजुरी जुनोनी कोळा गौडवाडी भागात आदी गावात निसर्गाचा मोठा कोप झाला असून परिसराला जोरदार गारपिटीने झोडपून काढले. कोळा नाझरे सर्कलमध्ये सुमारे दीड तास दगडासारख्या गारांचा पाऊस झाला, या भागातील आंबा डाळिंब गहू ज्वारी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे काढणीला आलेला हंगाम डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाला आहे याची दखल घेत तातडीने सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव तहसीलदार बाळूताई भागवत या अधिकाऱ्यासह नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शेतात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली शासनाने तातडीने पंचनामे करून भरघोस मदत करावी अशी मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शासनाकडे केली आहे विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
एकीकडे विरोधकांचा सांगोला पंचायत समितीच्या सदस्यांचा पदग्रहण सोहळा सुरू असताना आमदार बाबासाहेब देशमुख व सदस्य नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दौरा केल्याने जनतेतून शेतकरी वर्गाकडून कौतुक होत आहे.
गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी डाळिंबाची आंब्याचे गव्हाचे विक्रमी पीक घेतले आहे, मात्र यंदा गाराच्या पावसाने गाठल्याने उभी पिके आडवी झाली आहेत. गहू पीक डाळिंबाची झाडे भुई सपाट झाली आंब्याचा मोहर गळून पडल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. गव्हाची प्रत खालावणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक गणित कोलमडले आहे. नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. जुनोनी चे पोपट तडे यांचे तर आंब्याचे झाडावरचे आंबे खाली गळून पडले होते अंकुश होनमाने यांच्या डाळिंबाच्या बागावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग पडून डाळिंब खाली पडून डाळिंबाचे मोठे नुकसान झाले.
दत्ता होनमाने यांच्याही डाळिंबाच्या बागेची नुकसान झाले. बापू देशमुख दत्तू देशमुख दत्ता माने यांचा गहू संपूर्ण भुई सपाट होऊन मोठे नुकसान झाले आहे असल्याचे दिसून आले.काढणीला आलेल्या ज्वारीवरही पाणी फिरल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. यावेळी कोळा जिल्हा परिषद गटाचे सदस्य किरण भाऊ पांढरे पंचायत समिती सदस्य अमृत पाटील सोपान कोळेकर सरपंच राजू पाटील पत्रकार जगदीश कुलकर्णी यांच्यासह आदी नेतेमंडळी शेतकरी वर्ग पदाधिकारी उपस्थित होते.
जुनोनी येथे नुकसानग्रस्त आंब्याच्या झाडाची पाहणी करताना आमदार बाबासाहेब देशमुख तहसीलदार बाळू ताई भागवत तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांच्यासह आदी….


























