*दावणगीर शालेय व्यवस्थापन समिती राम मोरेवाड यांची बिनविरोध निवड*
————————————————————————–
देगलूर / प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील दावणगिर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन व्यवस्थापक समिती गठीत करण्यात आली असून यात नवनवर्जीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राम पंढरी मोरेवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद शाळेतील शाळेय शिक्षण व्यवस्थापन समिती यांचा कार्यकाळ संपल्यानंतर दावणगीर येथील राम पंढरी मोरेवाड हे सामाजिक चळवळीतल
समाजसेवक म्हणून गोरगरिबाच्या शिक्षणासाठी आवड असलेले शिक्षण प्रेमी आपल्या शाळेचा सर्व विकास व्हावा म्हणून शाळेमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढावे या हेतूने गावाच्या वतीने जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षाखाली गावातील पालक वर्ग बैठक घेऊन राम मोरेवाड यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड तर उपाध्यक्षपदी मारोती पारसे यांची निवड करण्यात आले आहे.
त्यावेळेस मुख्याध्यापक एन. एस.देशपांडे , हंगरगे बी. एन , हांडे जी.एम, बिरादार व्ही. पी. पोलीस पाटील मधुकर रेड्डी संगनगिरे, मारेती ठावरे, मोहन पाटील , पाशुमिया शेख, लक्ष्मण टोके, तानाजी गोणेवाड, गायकवाड मारोती, नामदेव म्याकलवाड, संगीता देवकत्ते, आशा कांबळे, ज्योती कानशेट्टी, सुवर्णा पारसे, गंगाधर टोके , बालाजी मरखेले, संदीप गायकवाड, संग्राम मदने, गंगाधर जुलावार, ज्ञानेश्वर संगणगिरे, विद्यार्थी व पालक वर्ग गावातील नागरिक उपस्थित होते. अध्यक्ष राम मोरेवाड उपाअध्यक्ष मारोती पारसे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे .