सोलापूर : स्व. श्रीकिसन चुनिलाल लाहोटी चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूर आणि द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतिनिमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्वस्पर्धा संपन्न झाली.
अकराव्या वर्षातल्या या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा तेजस दिनकर पाटील प्रथम क्रमांक, मुंबई विद्यापीठ, मुंबईचा अभय कृष्णकांत आळशी द्वितीय क्रमांक तर दयानंद विधी महाविद्यालय, सोलापूरची विद्यार्थिनी कु. अमृता दादासाहेब बचुटे हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. तर उत्तेजनार्थ म्हणून हिराचंद नेमचंद महाविद्यालय, सोलापूर येथील शिवप्रसंद लक्ष्मीनारायण दोरनाल आणि द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूरची विद्यार्थिनी कु. साक्षी जिनेंद्र सुराणा यांची निवड करण्यात आली.
महर्षी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्ताने स्पर्धेसाठी महर्षी दयानंद सरस्वती : जीवन व कार्य, स्वामी विवेकनंदाच्या विचारांची समकालीन उपयुक्ताता, त्रिभाषासूत्र : अंमलाबाजवणीतील अडचणी, बदलत्या राजकारणाचे आणि सत्तेचे स्वरूप,खरेच आपण सुशिक्षित आहोत असे विविध विषय ठेवण्यात आले होते.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्ष म्हणून प्रा. विजयकुमार उबाळे, प्रमुख अतिथि म्हणून गोविंदप्रसाद लाहोटी आणि बसवराज कुलकर्णी, प्राचार्य बी. एच. दामजी, प्राचार्य एस. व्ही क्षीरसागर, प्राचार्य एस. व्ही. शिंदे, प्राचार्या एस. जे. गायकवाड उपस्थित होते. या स्पर्धेसाठी मुंबई, पुणे, लातूर, छ. संभाजीनगर, अहिल्यानगर आणि स्थानिक विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. दामजी यांनी सांगितले आहे. स्पर्धेचे समन्वयक प्रा. आर. व्ही. शिंदे, प्रा. जी. डी.बिराजदार, यांनी काम पहिले. घनाते, डॉ. गडदे, डॉ. बिराजदार, सातालोलू, साखरे, हराळे व चलवादी आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.


























