सोलापूर : राहत्या घराजवळ तोल जाऊन पडलेल्या व्यकतीचा मृत्यू झाला. हा प्रकार 23 रोजी रात्री दहाच्या सुमारास घडला. शनिवारी उपचारास दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.
श्रीनिवास अंजय्या गज्जल (वय 56 , रा. जुना विडी घरकुल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 23 ऑक्टोबरच्या रात्री दहाच्या सुमारास श्रीनिवास यांना राहत्या घराजवळ अचानक चक्कर आली. यात ते तोल जाऊन खाली पडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल केले. तेथून डॉक्टरांच्या सल्ल्याने 24 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु शनिवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.


















