उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीय. लखनऊ येथील पोलिस नियंत्रण कक्षाला आलेल्या अज्ञान कॉलवरून ही धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केलाय.
लखनऊच्या मध्य विभागातील महानगर कोतवाली येथे हवालदार उधम सिंग यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हवाला उधम सिंग यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री 10 वाजून 8 मिनीटांनी त्यांच्या मोबाईलवर कॉल आला होता. फोन करणाऱ्याने सीएम योगींना बॉम्बने उडवले जाईल असे सांगितले. उधम सिंह यांनी फोन करणाऱ्याचे नाव विचारले असता त्याने फोन कट केला. त्यानंतर उधम सिंह यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली.त्यानंतर एकच गोंधळ उडाला. सध्या सुरक्षा मुख्यालयात तैनात असलेल्या मुख्य हवालदाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि यंत्रणांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपींच्या शोधासाठी 4 पथके तैनात करण्यात आली आहेत. सव्र्हेलन्स सेलच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल ट्रेस केला जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.