तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad attack ) यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी दीपक काटे याला अक्कलकोट न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सहआरोपी भवानेश्वर शिरगिरे याच्यावरही अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दोन्ही आरोपींना अक्कलकोट न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिलांनी या हल्ल्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस कोठडीची मागणी केली. (Praveen Gaikwad attack ) न्यायालयाने युक्तिवाद ऐकल्यानंतर दीपक काटे याला दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. (Praveen Gaikwad attack )
सध्या पोलिस विभाग या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर भारतीय दंडविधानाच्या विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. पुढील दोन दिवस पोलिस कोठडीत आरोपीची कसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
मराठा समाजाच्या संघटनांनी हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी कायम ठेवली आहे.