जेऊर – कुणबीचे दाखले कुर्डूवाडीचे प्रांताधिकारी यांच्याकडून अडवले जात आहेत त्यात सुसूत्रता यावी. असा आरोप करत सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन देण्यात आले.
करमाळा तालुक्यातील बहुतांश लोकांच्या कुणबी नोंदी मराठी व मोडी लिपीत स्पष्टपणे आढळून येतात या अगोदर नोंदीचा व इतर आवश्यक पुराव्यांचा अभ्यास करून दाखले तात्काळ मिळत होते मात्र आता त्यात दिरंगाई होत आहे. यामुळे शैक्षणिक, राजकीय व विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून कुणबी लोकांचे नुकसान होत आहे. सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जर अर्जदार प्रतिज्ञापत्र सादर करताना सही करत असेल तर सेल्फ अटेस्टेड हे कशासाठी ही जाणीवपूर्वक अडवणूक आहे . घरातील एका प्रकरणाला तहसीलदार प्रमाणित प्रत असेल तरी घरातील दुसऱ्या प्रकरणाला ओरिजनल प्रति किंवा पेपर मागून अडवणूक केली जात आहे .कुटुंबामध्ये जुने जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र असतानाही जाणीवपूर्वक प्रकरणे बाजूला ठेवली जात आहे जुन्या जात पडताळणी वैधता प्रकरणाला कवडीची ही किंमत दिली जात नाही . महसुली पुरावे असतानाही अनावश्यक फेरफार ची मागणी जाणीव पर्वक करून आडवणूक होत आहे .
प्रकरण जर करमाळा तहसील कार्यालयाकडून कुर्डूवाडी प्रांत कार्यालयाकडे आवकजावक च्या माध्यमातून जात असेल व त्रुटी लावून परत करमाळा येथे येत असेल तर ते प्रकरण फेर सादर करताना तहसीलदारांची सही घेऊन करमाळ्यातच ऑनलाइन करून देण्यात यावे वरील सर्व अडवणुकीचे मुद्दे सकल मराठा समाज करमाळा यांच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांच्यासमोर ठेवण्यात आले.आणि दाखले वाटपात सुसूत्रता येण्यासाठी संबंधितांना तात्काळ सूचना द्याव्यात अन्यथा सकल मराठा समाज करमाळा यांच्यावतीने संबंधितांचा निषेध नोंदवून 1 जानेवारी 2026 रोजी नववर्षाच्या स्वागतावर शासनाचा , कलेक्टर ऑफिस सोलापूर , कुर्डूवाडी प्रांत ऑफिसचा निषेध म्हणून एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी सोलापूर जिल्हा सकल मराठा समाजाचे माऊली पवार सकल मराठा समाज करमाळा चे सचिन काळे दादासाहेब तनपुरे दीपक गायकवाड उमेश काळे पांडुरंग साळुंखे आदी मराठा बांधव उपस्थित होते .
कुर्डवाडी प्रांत ऑफिस मधून जाणीवपूर्वक मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या दाखले काढण्यास त्रास दिला जात आहे याबाबत लवकरच मोठे जन आंदोलन करमाळा येथे उभा करणार आहोत
– सचिन काळे मराठा समन्वय व मराठा सेवा संघाचे करमाळा तालुका अध्यक्ष


























