माळीनगर – शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज संचलित रत्नाई कृषी महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र शासन “कृषी विभाग कार्ये आणि त्याचा विस्तार” या विषयावर व्याख्यान उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाप्रसंगी अकलूज विभागाचे मंडल कृषी अधिकारी श्री. सतीश कचरे यांनी कृषी विभागाचे महाविस्तार ॲप या संदर्भात सखोल मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना घरबसल्या कोणताही खर्च न करता इतंबूत माहिती सहज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच सहाय्यक कृषी अधिकारी नितीन ढगे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूत आणि कृषीकन्यांना भविष्यात कृषी क्षेत्राबरोबरच इतर विविध क्षेत्रांमध्ये कसा वाव आहे, कृषी पदवी कालावधीमध्ये अभ्यास कसा करावा, शेतकऱ्यांना अर्थातच पालकांना शेती संशोधन आणि त्याची अंमलबजावणी कशी करावी, कृषी उद्योग कसे उभारावेत, या मुद्द्यावर सहाय्यक कृषी अधिकारी सौ. सारिका एकतपुरे यांनी प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. सचिन एकतपुरे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीमहाविद्यालयाचे प्राचार्य रविराज नलावडे, प्रा. सचिन भोसले, डॉ. बंडोपंत शिंदे, प्रा. आबासाहेब तमनर, प्रा. संदीप कांबळे, प्रा. नवनाथ गाढवे, प्रा. आर. वी. कणसे व श्री. दिलीप भोसले यांनी परिश्रम घेतले. या व्याख्यानामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
अशा विविध उपक्रमांसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक संचालक माननीय श्री. जयसिंह मोहिते- पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. संग्रामसिंह मोहिते – पाटील, संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, सयाजीराजे मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याचे प्रा.नलावडे यांनी सांगितले.



















