सोलापूर – सांगोला तालुक्यातील चिणके येथील मालमत्ता क्रमांक ७२७ मध्ये छत्रपती संभाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे बसविले होते. त्यापैकी फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गैरमार्गाने हटवुन गटविकास अधिकारी कुलकर्णी व तहसिलदार कणसे यांनी महामानवाच्या पुतळयाची अवहेलना केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द प्रशासकिय व फौजदारी कारवाई करण्यात यावी , म्हणून सोमवार दिनांक ३ नोव्हेंबर पासुन चिणके गावापासून पायी लाँगमार्च व दिनांक ७ नोव्हेंबर पासुन सोलापूर जिल्हा परिषद समोर बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबले आहे.
पंचायत समिती प्रशासन व तहसिल प्रशासन यांचेवर गावातील विनायक मिसाळ यांचे वर्चस्व असुन त्यांच्या सांगण्यावरुन प्रशासनाने खोटी व दिशाभुल करणारी माहिती कळविली आहे. याची शहानिशहा करावी. तसेच डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळा गैरमार्गाने हटविणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी चिणके येथील अबालवृध्द, महिला मोठ्या संख्येने उपोषणाला बसले आहेत.



















