वेळापूर – येथील सकल मराठा समाज बांधव यांच्यावतीने संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट व हत्या कट रचणारा धनंजय मुंडे यांच्यावर कडक कारवाई वेळापूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
तसेच धनंजय मुंडे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक वेळापूर चौक येथे करण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.























