कळंब / धाराशिव : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन तसेच आरोग्य सुविधा , मोफत औषधोपचार , तसेच इतर सवलती साठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे , याविषयीची अंमलबजावणी ५ डिसेंबर पासून सुरू करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.
या सुविधासाठी आवश्यक कागदपत्रात ६० वय वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठनागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र अनिवार्य केले आहे, परंतु सदरील ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र कळंब तहसील कार्यालयाकडून दिले जात नाहीत सदरील ओळखपत्र धाराशिव व अन्य तहसील कार्यालयाकडून देण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे व याविषयीचे निवेदन नायब तहसीलदार गोपाळ तापडिया याना ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या वतीने देण्यात आले आहे .
याविषयी तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, जिल्हा उपाध्यक्ष अच्युतराव माने, तालुका सचिव माधवसिंग राजपूत, कार्यकारणी सदस्य रामभाऊ कवडे, बशीर., पठाण, गुलाब बागवान, कल्याण खापे आदींनी केली आहे.























