सोलापूर – सोलापुर जिल्हा व दक्षिण सोलापुर तालुका कॉग्रेस कमिटीच्या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉग्रेस पक्षाने होटगीचे सामाजिक कार्यकर्ते दक्षिण सोलापुर तालुका युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांच्या मातोश्री धानम्मा व्हसमाने यांना होटगी पंचायत समितीसाठी तिकीट मिळावे अशी मागणी दक्षिण सोलापुर कॉग्रेस सेवादल यंग ब्रिगेड तालुका अध्यक्ष मौलाली शेख यांनी जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार व तालुका अध्यक्ष भिमाशंकर जमादार यांच्या कडे केली आहे.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक देवकते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील, संजय गायकवाड, राधाकृष्ण पाटील उपस्थित होते.




















