बा-हाळी / नांदेड – शासकीय पोर्टलद्वारे सर्व तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांसाठी नवीन लॅपटॉप व प्रिंटर-कम-स्कॅनर तात्काळ उपलब्ध करून द्यावेत. कालबाह्य उपकरणांच्या विल्हेवाट / बदलाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी तहसीलदार राजेश जाधव यांच्याकडे निवेदनाव्दारे तलाठी संघटनेचे अध्यक्ष औदुंबर वाडीकर यांनी केली आहे.
तालुका महसूल विभागातील सर्व कामे ऑनलाइन झाल्यामुळे या कामात मोठी पारदर्शकता आली असताना देण्यात येणारे उपकरण जीर्ण झाल्यामुळे शेती कामासंबंधी अनेक अडचणी येत आहेत शासनाने रिकामे ऑनलाइन केली खरी पण तेवढे ग्राम महसूल अधिकाऱ्यांना तांत्रिक उपकरणे पुरवठा न केल्याने या ऑनलाइन कामासाठी अनेक अडचणी येत असल्यामुळे तांत्रिक सहाय्य (AMC/Helpdesk) व आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
परंतु शासन स्तरांवर आदेश पारित होऊनही अद्याप पावतो कुठलीही कारवाई झाली नसल्याने महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना यांच्या उपरोक्त संदर्भीय निवेदनानुसार मुखेड तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी हे दि.15 डिसेंबर रोजी आपापले DSC तहसील कार्यालयात जमा करून ऑनलाईन कामकाज पूर्णत बंद करून बहिष्कार घालण्याचा इशारा निवेदनाव्दारे तलाठी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या निवेदनावर औदुंबर वाडीकर ता.अध्यक्ष (तालुका तलाठी संघटना मुखेड) ,एस. के. देशमुख (ता.सचिव)सह आदीचे स्वाक्षरी आहेत.

























