तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : सणासुदीच्या काळात लोकांना घराच्या पाडकामाबाबतच्या नोटीसा देऊन त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण तयार करु नका. जी कारवाई करायची असेल, ती गणेशोत्सवानंतरच करा. अधिकाऱ्यांनी लोकांना कोणत्याही नोटिसा देऊ नये, असे स्पष्ट आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
उत्तर मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेली कारवाई थांबवण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. तर नागरिकांनी केलेली बांधकामे अनधिकृत असल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. ही कारवाई गणेशोत्सवापर्यंत थांबविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र, बनावट नकाशे तयार करून बांधकामे केलेल्यांना अभय मिळणार नाही अशा इशाराही त्यांनी दिला आहे.
Post Views: 6