मोडनिंब – रोटरी क्लब ऑफ मोडनिंब (ता. माढा) व पंढरपूर येथील तंटक हॉस्पिटल यांच्या वतीने गिड्डेवाडी (ता.मोहोळ) व बावी (ता. माढा) येथे विद्यार्थ्यांसाठी दंतरोग चिकित्सा शिबिरांचे आयोजन करण्यात आले.
गिड्डेवाडी येथील जि. प. शाळेतील शिबिरात ४५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.शिबिरात पहिली ते चौथीतील मुले-मुली तसेच अंगणवाडीतील मिळून ४५ विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली.बावी येथील शिबिरात १२१ विद्यार्थ्यांची तपासणी शिबिरात पहिली ते सातवीतील १०६ विद्यार्थी आणि अंगणवाडीतील १५ मुलांची दंत तपासणी करण्यात आली.
रोटेरियन सुनील रेपाळ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.सुरुवातीला डॉ. मयुरी तंटक यांनी दात कसे घासावेत, दातांची योग्य निगा कशी राखावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. मयुरी तंटक व डॉ. निखिल तंटक यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी केली.
या उपक्रमासाठी नेताजी सांगुळे, अनंतराव बिडवे, सेविका सुमन गिड्डे तसेच सरपंच विकास गिड्डे यांनी मोलाचे सहकार्य केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश गिड्डे यांनी रोटरीच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली, तर सचिव डॉ. संतोष दळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. शशिकांत वागज, अनिल शिंदे, प्रकाश सुर्वे, तानाजी इंगळे आदी उपस्थित होते.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी औदुंबर पाटील, अनिल गोळवलकर, डॉ. शशिकांत वागज, सुनील पुरवत यांनी सहकार्य केले.
दोन्ही गावांत झालेल्या या वैद्यकीय शिबिराचे स्थानिक स्तरावर कौतुक होत असून विद्यार्थ्यांना दंतआरोग्याबाबत जागरूक करण्याचा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.दोन्ही शिबिरांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
























