सोलापूर – आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे गुरुवार दि.२७ नोव्हेंबर पासून तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. दुपारी ३ वाजता सोलापूर शहर – जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर अण्णा बनसोडे यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, चार हुतात्मा, अहिल्यादेवी होळकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
यावेळी शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, जेष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नेते तौफीक शेख,प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे,सचिव इरफान शेख,प्रमोद भोसले,महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, नजीब शेख, माजी नगरसेवक गणेश पुजारी, सुहास कदम आदींची उपस्थिती होती.फटाक्यांची आतषबाजी आणि वाद्याच्या गजरात सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचे स्वागत झाल्यानंतर सोलापूर शहरातील तीन दिवसीय कार्यक्रमांना जोमाने सुरुवात झाली.



















