अक्कलकोट – आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धा खुल्या गटात देवदत्त पटवर्धन,सौरव शाहू, अभिजीत संगा हे खेळाडू चार पैकी चार गुण घेऊन आघाडीवर आहेत तर 13 वर्षाखालील गटात नैतिक होटकर,श्रेयस कंदीकटला, आयुष्य जानगवळी, सुभान शेख हे खेळाडू चार पैकी चार गुण घेऊन आघाडीवर आहेत.
अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त जगदीश मंगल कार्यालय येथे संपन्न होत असलेल्या आमदार चषक बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन सोलापूरचे माजी आमदार दिलीपरावजी माने यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रशांत पाटील मराठा सेवा संघ प्रदेश अध्यक्ष,हनुमंत कुलकर्णी भाजपा मार्गदर्शक, नवनाथ कदम,विकास कदम वर्षा सर्व सेवा स्वयंरोजगार सहकारी संस्था सोलापूर व शरद नाईक सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव हे उपस्थित होते,
आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी आमदार दिलीप माने यांनी सर्व जगात सुप्रसिद्ध होत असलेल्या बुद्धिमत्ता व सहनशक्ती वाढवणाऱ्या बुद्धिबळ खेळाकडे लक्ष द्यावे व मोबाईल पासून दूर राहावे असे आवाहन केले
ही स्पर्धा संपन्न करण्याकरिता स्पर्धेचे प्रमुख पंच प्रशांत पिसे,इरान्ना जमादार,सचिन चव्हाण, सम्मेद हुल्ले,संस्कार भस्मे बिलाणीसिद्ध बिराजदार हे काम पाहत आहेत.




















