टेंभुर्णी – कन्हेरगाव (ता. माढा) येथे मंगळवार, दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजता पोलीस उपनिरीक्षक दिलीप पांडुरंग शिंदे व त्यांच्या पत्नी रतन दिलीप शिंदे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा सत्कार कन्हेरगाव ग्रामस्थ व नरवीर उमाजी नाईक संघटनेच्या वतीने करण्यात आला.
दिलीप शिंदे हे पुणे ग्रामीण अंतर्गत हवेली पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक स्व. पांडुरंग (तात्या) शिंदे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या प्रदीर्घ व प्रामाणिक सेवेस गौरव म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कन्हेरगावचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रामोशी वस्ती येथील माजी सरपंच दशरथ चव्हाण यांच्या निवासस्थानी हा सत्कार समारंभ संपन्न झाला.
यावेळी माजी सरपंच मनिषा चव्हाण, सतिश शिंदे,राजेंद्र केदार, माणिक चव्हाण,दशरथ चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य संपत चव्हाण,अनिल चव्हाण,दादासाहेब चव्हाण, सोमनाथ चव्हाण, बापूसाहेब बोडरे, कुमार चव्हाण,हनुमंत चव्हाण, उमेश चव्हाण,सुरेश माने,चेतन चव्हाण,शिवराज चव्हाण,शिवतेज चव्हाण,सागर चव्हाण,सिद्धेश्वर चव्हाण,किसन चव्हाण,पद्मिनी चव्हाण, बानूबाई चव्हाण,आनंदा चव्हाण, वैशाली माने,चंदना चव्हाण, गायत्री चव्हाण, लक्ष्मी चव्हाण, अनुराधा चव्हाण, प्रतिक्षा चव्हाण, शिवानी चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दिलीप शिंदे यांच्या सेवाकाळातील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढत पुढील सामाजिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चव्हाण परिवाराच्या वतीने परिश्रम घेतले.






















