बार्शी – येथील दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी, संस्कार क्लासेसचे संचालक विजय केसरे
प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्याध्यापक श्रीकांत कुंभारे, मुख्या. सचिन काळे मार्गदर्शक म्हणून युवराज जगताप, संतोष ठोंबरे, सौ.शितल पाटील उपस्थित होते.
सुरुवातीस क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
इयत्ता १० वी मधील विध्यार्थी यांनी आपली मनोगत व्यक्त केली. प्रशालेतील शिक्षक संतोष ठोंबरे, सौ. शितल पाटील यांनी विध्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षक युवराज जगताप यांनी यशस्वी जीवनासाठी अंगी कोणकोणत्या बाबी असाव्या, चांगल्या मित्रांची निवड, कामात सातत्य, चारित्र्य ध्येय निश्चिती, व्यसनापासून दुरावा, स्वावलंबन, मोबाईल वापर यासंबंधी विस्तृत मार्गदशन केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विजय केसरे यांनी ‘परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर व्याख्यान दिले. मुलांना जिद्द कशी असावी, वेळेचे नियोजन करुन यशप्राप्तीसाठी महत्वाच्या गोष्टी विद्यार्थाना सांगितल्या, परिस्थितीची ज्यांना जाणीव असते ते जीवनात यशस्वी होऊ शकतात. परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करणे महत्वाचे असते. हे विविध दाखले देऊन शिक्षण आयुष्यासाठी किती महत्वाचे आहे हे आपल्या मार्गदर्शनपर वक्तव्यातून समजावून दिले. परीक्षेसाठी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.
दिनेश घुले मित्रमंडळ यांचेकडून या १० वीच्या बॅचला इयत्ता १ ली ते ५ वीला अध्यापन करणारे गुरुवर्य युवराज जगताप सरांना शंभू राजांची सुंदर प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश घुले यांनी तर आभार कु.अंजली काळे हिने आभार मानले.
कार्यक्रमास राहुल ठोंगे, चंद्रकांत लोखंडे, सचिन काळे, संतोष ठोंबरे, श्रीमती संगीता काळे, श्रीकांत कुंभारे, युवराज जगताप, सुनिल लंगोटे, मंगेश मोरे, सौ. शितल पाटील, कु. प्रेरणा कसबे, सेवक संदीप भोरे, श्रीकांत चव्हाण उपस्थित होते.























