सोलापूर – कार्तिकी वारीसाठी सोलापूर शहरातील मेघ:श्याम घन:श्याम अडाणी मंडळाच्या पायी दिंडीने “ज्ञानोबा तुकाराम” च्या गजरात आज दि.२८आक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. यामधे सुमारे १५० वारकरी सहभागी आहेत.
येथील जुनी पोलीस लाईनमधील विठ्ठल मंदीरात अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप सुधाकरमहाराज इंगळे यांच्या हस्ते वीणापूजन तर कासेगाव चे माजी उपसरपंच विश्वपालक येणगुरे व सोसायटीचे माजी अध्यक्ष श्रीशैल भोज यांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात आले.
यावेळी वारकरी मंडळाचे प्रदेश उपाध्यक्ष हभप किसनबापू कापसे, हभप अनंतमहाराज कुलकर्णी, दै.तरुण भारतचे उपसंपादक हभप श्याम महाराज जोशी, विणेकरी हभप कारसेवक ज्ञानेश्वर चव्हाण, हभप पांडुरंग माळी, हभप अंकुश म्हेत्रे, दिंडी चालक नागनाथ पवार, मारुती पवार, माजी सैनिक शिवाजी खारे, शेषेराव चव्हाण, विठ्ठल येणगुरे, नागनाथ शिंदे, गिरजाप्पा लातूरकर, तुकाराम हब्बू, महादेव हब्बू, प्रकाश माळी, राजकुमार पाटील, भानुदास जाधव, मल्लिनाथ वाघे, पिंटू चौगुले, दिगंबर हेडे, चोपदार खंडू क्षिरसागर, रोहीत गुरव, सावता माळी, आदींसह महिला वारकरी उपस्थित होते.
या दिंडीसोबत कासेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील सुमारे १५० वारकरी सहभागी आहेत. दिंडी आज देगाव येथील वाडकर प्रशालेत पहिल्या मुक्कामासाठी विसावली. उद्या सकाळी सहा वाजता दिंडी तिर्हेमार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.


















