सोलापूर – दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या शाळांमध्येदेखील अनियमितता असल्याच्या तक्रारी दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडे केल्या आहेत. बोगस पदमान्यता, बनावट विद्यार्थ्यांची प्रत्यक्षात पाहणी न करता अनुदान वितरण केल्याचा प्रकार जिल्हा समाजकल्याण विभागाकडून होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांग शाळांची तपासणी करावी, अशी मागणी प्रमोद कलशेट्टी यांनी दिव्यांग आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार दिव्यांग आयुक्तांनी जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांची तपासणी करून अहवाल पाठवावे, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांना दिली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांची तपासणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील दिव्यांग शाळेत अनियमितता असल्याची तक्रार आली आहे. त्यामुळे सर्व दिव्यांग शाळांची तपासणी करून, त्याचा अहवाल दिव्यांग आयुक्तांकडे पाठवावा, असे पत्र दिव्यांग आयुक्त समीर कुर्तकोटी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांची तपासणी होणार आहे.
….
…
लक्ष्मी दर्शनामुळे बोगस शाळांना अनुदान ?
…
जिल्ह्यात बऱ्याच दिव्यांग शाळा आहेत. त्यातील अनेक चांगल्या शाळांना वेळेवर अनुदान मिळत नाही. मात्र, बऱ्याच बोगस दिव्यांग शाळांना लक्ष्मी दर्शनामुळे वेळेवर अनुदान मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ‘ अर्थपूर्ण ‘ संबंधामुळे गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा झेडपीत होत आहे. त्यामुळे या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा शोध मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी घेऊन, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
….
झेडपीचे कर्मचारी वैतागले
….
सुलोचना सोनवणे यांच्याकडे सामाजिक न्याय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त म्हणून मूळ पदभार आहे. त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग आणि दिव्यांग कार्यालयाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. मात्र, त्या सामाजिक न्याय भवन येथेच जास्त वेळ बसत असल्याने समाजकल्याण विभाग, दिव्यांग कार्यालयातील कर्मचारी सामाजिक न्याय कार्यालयाकडे हेलपाटे मारून वैतागल्याची चर्चा कर्मचाऱ्यांत होत आहे.
…
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...