जिंतूर / परभणी – लोककल्याणकारी प्रवचन समितीच्या वतीने राष्ट्रसंत प पु श्री ललित प्रभ महाराज व डॉ. श्री शांतीप्रभ महाराज यांच्या जीवन जगण्याची कला या विषयावर प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रवचन जे जीवन बदलेल राष्ट्रसंत ललित प्रभू महाराज यांच्या सुमधुर वाणीतून ‘जीवन जगण्याची कला’ या विषयावर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ता. ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत सकाळी नऊ ते साडे अकरा या वेळेत प्रवचनाचा कार्यक्रम होणार असून शनिवार ता. ६ रोजी सकाळी साडे सात वाजता अण्णाभाऊ साठे पुतळा ते मार्केट यार्ड पर्यंत शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत कलशधारी महिला, अश्व, रथ, लेझीम, झाकी यासह विविध उपक्रम होणार आहेत.
त्यानंतर प्रवचनाचा कार्यक्रम होईल. या शोभा यात्रेमध्ये जास्तीत जास्त महिला व पुरुष भाविकांनी सहभागी व्हावे जिंतूर शहरात पहिल्यांदाच राष्ट्र संत यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे.
या प्रवचनाचा लाभ तालुक्यातील जास्तीत जास्त जनतेने घ्यावा अशी आवाहन लोककल्याणकारी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.























