सोलापूर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक रेल्वे ब्रिजचे पाडकाम होणार असल्याने रहदारी व वाहतुकील पर्यायी मार्ग म्हणून ५४ मीटरचा रस्ता सुरु करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी बुधवारी मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक डॉ. सुजीत मिश्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. दरम्यान महापालिका आयुक्तांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार आहे. या कामासाठी येथील रस्ता बंद ठेवण्यात येणार असल्याने या ठिकाणी पर्यायी मार्ग म्हणून ५४ मीटरचा रस्ता सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भात महापालिका आयुक्त
डॉ.सचिन ओम्बासे व मध्य रेल्वे सोलापूरचे मंडल रेल प्रबंधक डॉ. सुजीत मिश्रा यांच्यात सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान पर्यायी मार्ग त्वरित सुरू करण्याबाबत आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी भर दिला. तसेच टिकेकरवाडी येथील रेल्वे स्टेशन विस्तारिकरण होणार असून त्या स्टेशन ला जोडणाऱ्या रस्ता परिसराला कुमठा गाव व होटगी रोडशी जोडणाऱ्या अप्रोच रोड संदर्भातही चर्चा करण्यात आली. दरम्यान आयुक्तांनी ६ कमानी येथील नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या कामामुळे परिसरातील पावसाचे पाणी नाल्यातून सहज प्रवाहित होईल आणि पाणी साचण्याची समस्या दूर होईल, असे त्यांनी सांगितले.
यानंतर स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित व सध्या नागरिकांसाठी खुले केलेल्या एडवेंचर पार्कला भेट दिली. या ठिकाणी आयुक्तांनी पार्कमधील सुविधा, सुरक्षा व्यवस्था व देखभालीसंदर्भात तपासणी केली. तसेच पार्क परिसर अधिक आकर्षक व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.
त्यानंतर त्यांनी रंगभवन प्लाझा येथे पाहणी करून परिसरातील स्वच्छता, प्रकाशयोजना आणि सुशोभीकरणाच्या कामांची माहिती घेतली.
शेवटी समाचार चौक येथे सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची आयुक्तांनी पाहणी केली. या ठिकाणी सुंदर सीटिंग एरिया, गार्डन, लाईटिंग आदी सुविधा निर्माण करण्याचे काम सुरु असून, चौक आकर्षक व नागरिकांसाठी विश्रांतीयोग्य बनविण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सर्व पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सर्व अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.त्या परिसरातील अतिक्रमण सुद्धा काढण्याचे सूचना दिल्या.यावेळी उपायुक्त आशिष लोकरे, रेल्वेचे अधिकारी एस. एच. मलभागे, योगेश पाटील, मंडल वाणिज्य प्रबंधक.ब्रजेश राय- व. मंडल परिचालन प्रबंधक. रामलाल प्यासे, भोसले,नगर अभियंता सारिका आकूलवार,अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, उद्यान प्रमुख स्वप्नील सोलनकर,सागर कुरसेकर आदी उपस्थित होते.



















