सोलापूर – दिनांक 25 ते 28 डिसेंबर यादरम्यान मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किशोरी स्पर्धेसाठी जि प शाळा अंत्रोळी शाळेची इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी कुमारी गौरी सिंगण हिची निवड झाली, शाळेच्या वतीने तिला भेटवस्तू देऊन तिचा सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी विद्यामंदिर वीट तालुका करमाळा येथे जिल्हा किशोर किशोरी संघाची निवड चाचणी घेण्यात आली होती.
शिक्षण अधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी रूपाली भावसार, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके, आयुब कलबुर्गी, केंद्रप्रमुख आमसिद्ध म्हेत्रे, मुख्याध्यापक युवराज राठोड, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीशैल कोरे सचिव सोमलिंग कोळी, शिक्षिका कीर्ती जाधव, पुष्पा बनसोडे, मीनाक्षी राठोड यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
तिला शाहू स्पोर्ट्स दक्षिण सोलापूरचे सचिव, श्रीरंग बनसोडे, खजिनदार नागनाथ म्हमाने यांचे मार्गदर्शन लाभले


























