बार्शी – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाताचीवाडी येथे निर्भया पथक व एकता महिला मंच तसेच आयुष व्यसनमुक्ती केंद्र जामगांव यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन व व्यसनमुक्ती तसेच मुलींची व महिलांचे सुरक्षा याविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाताचीवाडी विद्यार्थिनींच्या व सुरक्षिततेसाठी निर्भया पाथकाच्यावतीने कायदेविषयक मार्गदर्शन व व्यसनमुक्ती प्रभावी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाकरिता आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे, ऍड. सुप्रिया गुंड पाटील, निर्भया पथकाचे पोहेकॉ. बाबासाहेब घाडगे, मुख्याध्यापक जाधवर, शिक्षिका बांगर, एकता महिला मंच बार्शीचे प्रभाकर क्षीरसागर, रेश्मा मुकटे, राणी गात, शितल खंडागळे, सरपंच विद्या गात व पोलीस पाटील शितल घाडगे,व इतर सदस्य महिला, विद्यार्थी विद्यार्थ्यांनी तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी निर्भया पथकातील पोहेकॉ बाबासाहेब घाडगे, आयुष व्यसनमुक्ती केंद्र जामगांचे डॉ. संदीप तांबारे व ऍड. सुप्रिया गुंड पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस पाटील शितल घाडगे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळा कटिबद्ध असल्याचे सांगत अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.
निर्भया पथक बार्शी उपविभाग बार्शी चे पोहेकॉ बाबासाहेब घाडगे यांनी मुलींनी कायद्याचे महत्व, संकटाच्या प्रसंगी घ्यावयाची खबरदारी, संकटकालीन तक्रार कशी व कोठे करावी, मदतसेवा टोल फ्री क्रमांक, तक्रारपेटीचे महत्व तसेच पोलिसांचे तत्पर कार्य, सोशल मीडिया वापराचे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध याबाबत मार्गदर्शन केले व मुलींना सायबर गुन्हे, ऑनलाइन सुरक्षितता तसेच छेडछाड प्रतिबंध याविषयी माहिती दिली.
ऍड. सुप्रिया गुंड पाटील यांनी सर्व महिला व विद्यार्थिनींना महिलाविषयक कायद्याचे सखोल मार्गदर्शन करुन स्वसंरक्षणाचे मूलभूत धडे, गुडटच बॅडटच तसेच मुलींना येणाऱ्या इतर अडीअडचणी याविषयी माहिती देऊन आत्मविश्वास वाढविणाऱ्या टिप्स आणि प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणांसह विद्यार्थिनींना प्रेरित केले.
डॉ. संदीप तांबारे यांनी समाजामध्ये वाढलेली व्यासमाधीनता व त्यावरील उपाय तसेच व्यसनमुक्तीवर अनेक उदाहरणे देऊन व्यसनमुक्त समाज यावर सखोल मार्गदर्शन केले.
शाळेच्या शिक्षकांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. विद्यार्थिनींनी निर्भया पथक बार्शी उपविभाग बार्शी अधिकाऱ्यांशी संवाद साधत शंका दूर केल्या. उपस्थित एकता महिला मंचचे पदाधिकारी, पालक आणि कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिकि बांगर यांनी निर्भया पथकाचे, एकता महिला मंच व आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे मनःपूर्वक आभार मानले आणि शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अशा उपक्रमांची मालिका सुरुच राहील असे सांगितले.
मुलींना छेडछाडी संदर्भात काही तक्रार असल्यास किंवा काही अडीअडचण आल्यास निर्भया पथक,बार्शी उपविभाग बार्शी येथे कळविण्यास सांगितले.

























