सोयगाव / संभाजीनगर – तालुक्यातील कवली येथे दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी मराठा प्रतिष्ठानच्या वतीने एक अत्यंत स्तुत्य व सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम राबविण्यात आला. कवली गावात सुरू असलेल्या भागवत सप्ताहाच्या निमित्ताने मराठा प्रतिष्ठान सोयगाव तालुका तसेच मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान दादा गव्हाडे पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
या उपक्रमांतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबासाठी ‘हर घर हरिपाठ’ या संकल्पनेचे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच डिसेंबर महिन्यात वाढलेल्या कडाक्याच्या थंडीच्या पार्श्वभूमीवर गावातील ज्येष्ठ,वयोवृद्ध नागरिक तसेच महिला व पुरुष मिळून एकूण ८०० नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे कवली गावात समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
हा कार्यक्रम ह.भ.प.चंद्रकांत महाराज साक्रीकर,मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान दादा गव्हाडे पाटील, माजी सभापती चंद्रकांत पाटील,मराठा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष विजय काळे,तालुकाध्यक्ष विजय चौधरी गलवाडा चे माजी सरंपच सुरेखाताई तायडे,घोसलाचे गणेश माळी,कवलीचे वसंत बनकर,उपसरपंच ज्योतीताई मंगेश पाटील,पोलीस पाटील निवृत्ती केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी मराठा प्रतिष्ठानचे सदस्य रवी पाटील,दिनेश पाटील,योगेश पाटील,भीमराव पाटील,मनोज खोसे,अमोल पंडित,राहुल तराळ, श्रानेश्वर तराळ,युवराज पाटील,किशोर पाटील,प्रमोद वाघ,ज्ञानेश्वर युवरे, गणेश माळी,तिडका येथील मुजीफ पटेल,वाकडी येथील कृष्णा धुमाळ,उपलखेडा येथील गोपाल पाटील, सोनू तडवी,जरडीचे सचिन महाजन,सुनिल तिडके,चेतन पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमाबद्दल कवली गावातील नागरिकांनी मराठा प्रतिष्ठानचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
सोबत फोटो –

























