बार्शी – शहरातील वाढत्या थंडीमुळे शनी मंदिर आणि भगवंत मंदिरासमोर असलेल्या गरीब व निराधार नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून सुमारे २०० जणांना विविध मंडळे, क्रिकेट क्लबच्यावतीने ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी गणेश जव्हेरी, पैलवान विनोद वडतिले, प्रमोद भंडारी उपस्थित होते.
शहरात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. भगवंत मंदिर आणि शनी मंदिरासमोर असंख्य गगरीब व निराधार नागरिक आहेत. काहीजणांना अंथरुण, पांघरुण देखील नसतात. त्यामुळे ते रात्रभर थंडीत कुडकूडत असतात. सामाजिक बांधिलकी म्हणून शहरातील भवानी पेठ मित्रमंडळ, मोरया क्रिकेट क्लब, सोलापूर रोड मित्रमंडळ, जय जगदंब फाउंडेशन, रावण साम्राज्य, मोरया प्रतिष्ठान यांच्यामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास गणेश जव्हेरी, डॉ. व्यंकटेश काबरा, सागर सोत्रे, प्रमोद भंडारी, विनोद वडतिले, योगेश शुक्ल उपस्थित होते. या उपक्रमाबद्दल मंदिरासमोरील नागरिकांनी आभार मानले.
फोटो ओळी
बार्शी : शनी मंदिरासमोर गरीब व निराधार यांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.


























