सोलापूर – सोलापूर येथील जिग्नेश शहा व मित्र परिवाराच्या वतीने वडाळा येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटण्यात आले.
सध्या कडाक्याची थंडी असल्याने मतिमंद विद्यार्थ्यांना उबदार ब्लँकेट देण्याची मागणी मुख्याध्यापक संजयकुमार वाघमारे यांनी जिग्नेश शहा यांच्याकडे केली.त्यांनी लगेच होकार देऊन वडाळा येथे शाळेत येऊन विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट वाटप केले.यावेळी मुख्याध्यापक वाघमारे, वसतिगृह अधिक्षक अजित परबत, परिचारिका रत्नमाला करपे,दत्तात्रय वीर,शरद राऊत, पियुष शहा, दिपेश शहा,चेतनकुमार शहा,सिध्दु स्वामी, शंकर स्वामी,निरव शहा,देवम शहा,नमन शहा,अमरेश स्वामी,श्रीशैल स्वामी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक वाघमारे म्हणाले,”आम्ही ज्या ज्या वेळी जिग्नेशभाईंकडे मदतीची मागणी करतो त्या त्या वेळी त्यांनी शाळेला मदत केली असून विद्यार्थ्यांना फॅन, बसण्यासाठी सिमेंट बाकडे दिले आहेत.तर नेहमीच ते खाऊ वाटप करतात. समाजातील दानशूर व्यक्तींनी माऊली मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करावा आणि सामाजिक जाणिवेचे नाते दृढ करावे.”
फोटो ओळी – वडाळा येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सोलापूर येथील जिग्नेश शहा परिवाराच्या वतीने ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी छायाचित्रात जिग्नेश शहा,शहा परिवार, मुख्याध्यापक संजयकुमार वाघमारे, दत्तात्रय वीर आदी


























