सोलापूर – आपुलकीचं नात आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीने गरीब व गरजूंना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना चौडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी म्हणाले की केवळ स्वत: प्रकाशमान व्हायचे नाही तर इतरांनाही प्रकाशमान करायचे हा संकल्प करून चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराने वंचितांना दिवाळी फराळाचे वाटप केले आणि हा अत्यंत स्तुत असा कार्यक्रम आहे. पुढे बोलताना शिक्षण मंडळाचे माजी चेअरमन वासुदेव इप्पलुल्ली म्हणाले की चन्नवीर चिट्टे राजकारणी असून सुद्धा त्यांचा समाजकार्यावर जास्त भर आहे आणि हे खुप कौतुकास्पद आहे.
हरिभाऊ पुरूड म्हणाले की आज भारतीय संस्कृतीचे दर्शन घडल.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी फराळ वाटपाच्या या कौटुंबिक कार्यक्रमाचा एक भाग होता आलं आणि आशीर्वाद देण्यासाठी जमलेल्या मंडळीना पाहून आनंद वाटला, हे मी माझं सौभाग्य समजते. असंख्य हजारो आशीर्वादाचे हात तुमच्या पाठीशी असताना असेच पुढे चालत रहा. तुमची वाट प्रकाशाची आहे. मित्रपरिवार ही तुमची श्रीमंती आहे. देणं ही तुमची संस्कृती या दातृत्व भावनेत अशीच भर पडत राहो आणि समाजाची ही सेवा घडत राहो. प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी कारखानदार नागनाथ येले, स्वयंसेवक व्यंकटेश कैंची, चंद्रकांत जक्कन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण करजगी यांनी, प्रास्ताविक श्रीनिवास दासरी तर आभार प्रदर्शन रवि शहापूरकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश हलसगी , गुरू कोळी, सद्दाम कोसगीकर, रवि कोळी , परमेश्वर क्षीरसागर , लक्ष्मीकांत बिराजदार, किरण वल्लाल, सोमनाथ कलशेट्टी, विश्वनाथ कट्टा, रेवणसिद्ध बिराजदार, श्रीनाथ संदुपटला, अंबादास पाटील यांनी परिश्रम घेतले.