जिंतूर / परभणी – जिंतूर तालुक्यातील आडगाव सर्कल मध्ये भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आडगाव सर्कलमधील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये डॉ. देवराव कऱ्हाळे व त्यांच्या सहपत्नी सौ मीरा देवराव कऱ्हाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
आडगाव, आडगाव तांडा, देवसडी, टाकळखोपा, श्रीरामवाडी, भुसकवडी, दगडवाडी, सोरजा, सोरजा तांडा, मोहखेड, मोहखेड तांडा आणि चीतणरवाडी या गावांतील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.
समाजभानातून शिक्षणास हातभार लावणारी ही पहल शिक्षक व पालकांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. शैक्षणिक साहित्य वितरणावेळी मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. यावेळी डॉ कऱ्हाळे यांनी आपल्या मनोगतमध्ये सांगितले की मी ज्या समाजात, खेड्यात प्राथमिक शिक्षण घेतले तेथील छोट्या छोट्या खेड्यातील, तांड्या तील हलाकीच्या परिस्थितीची मला जाण आहे. त्या बिकट परिस्थिती मध्ये माझा हातभार लागावा या सहकार्याच्या भावनेतून मी हे शैक्षणिक साहित्य वाटप करत आहे. महापुरुषाच्या विचारांचा वारसा, हेतू हा समाजसुधारणेचा होता म्हणून मी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शिक्षणावर भर देत आहे.



















