पूर्णा / परभणी – पूर्णा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक साठी निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांना बुधवारी पूर्णा तहसील कार्यालयात निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले.
बुधवारी सकाळी 11 वाजता पूर्णा तहसील कार्यालयात निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्या प्रमुख उपस्थित नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.
यावेळी सहाय्यक निर्वाचन अधिकारी प्रशांत थारकर,निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार पंढरीनाथ शिंदे ,व्यंकटेश जेजरवार आदी उपस्थित होते या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या साठी एकूण 14 उमेदवार निवडून रिंगणात आहेत तर 23 नगरसेवकांच्या निवडीसाठी एकूण 112 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत या सर्व उमेदवारांना आता चिन्हाचे वाटप करण्यात आल्यामुळे निवडणूक प्रचाराला वेग येणार आहे.


















